१७ – परभणी लोकसभा मतदारसंघ

परभणी लोकसभा मतदारसंघ माहिती

Parbhani loksabha constituency
१७ - परभणी लोकसभा मतदारसंघ नकाशा

परभणीला पूर्वी “प्रभावतिनगर” असे म्हटले जात होते. मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांपैकी परभणी हा एक जिल्हा आहे. परभणी जिल्ह्या हा दुष्काळग्रस्त आहे. या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्याप्रमाणात आहे. परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौरस किमी आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी आहे. या जिल्ह्यामध्ये गोदावरी, दुधना, करपरा आणि पूर्णा या नद्या आहेत. तसंच रेल्वेचे मोठे जाळे परभणीत आहे. मात्र या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. तसंच आरोग्य आणि तरुणांच्या नोकरीचा प्रश्न खूप गंभीर आहे.

परभणी मतदार संघ ३० वर्षाच्या काळात फक्त १९९८ साली १६ महिन्यासाठी काँग्रेसकडे गेला होता. नाहीतर हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. या मतदार संघात इतर कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून येता आले नाही. परभणी लोकसभा मतदार संघात जालन्याचे २ आणि परभणीचे ४ असे एकूण ६ विधानसभा मतदार संघ आहे. यातील जिंतूर, घनसावंगी, गंगाखेड हे तीन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तर परभणीचा मतदारसंघ शिवसेना, पाथरी मतदारसंघ अपक्ष आणि परतूर मतदारसंघ भाजपकडे आहे.

मतदारसंघ क्रमांक – १७

नाव – परभणी

संबंधित जिल्हे – परभणी आणि जालना

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

प्रमुख शेतीपीक – सोयाबिन, हळद, हरभरा

शिक्षणाचा दर्जा – ७५.२२ टक्के

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – ११ लाख ६१ हजार ६२४

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ६ लाख ३७ हजार ६७७

महिला – ५ लाख २३ हजार ९४६


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

संजय जाधव – शिवसेना – ५ लाख ३८ हजार ९४१

राजेश विटेकर -राष्ट्रवादी काँग्रेस – ४ लाख ९६ हजार ६४२

आलमगीर खान – वंचित बहुजन आघाडी – १ लाख ४९ हजार ९४६

राजन श्रीसागर – कम्युनिस्ट पार्टी – १७ हजार ०९५


परभणी विधानसभा मतदारसंघ

९५ – जिंतूर – विजय भांबले, राष्ट्रवादी काँग्रेस

९६ – परभणी – राहुल पाटील, शिवसेना

९७ – गंगाखेड – मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस

९८ – पाथरी – मोहन फड, अपक्ष

जालना विधानसभा मतदारसंघ

९९ – परतूर – बबनराव लोणीकर, भाजप

१०० – घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस


shivsena mp Sanjay jadhav
शिवसेना खासदार संजय जाधव

विद्यमान खासदार – संजय जाधव, शिवसेना

सध्या शिवसेनेचे संजय जाधव हे खासदार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांचा पराभव केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना ५ लाख ७८ हजार ४५५ मते मिळाली होती. संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे यांचा १ लाख २७ हजार १५५ मतांनी पराभव केला होता.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातील परिस्थिती वेगळी असले. कारण शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद मोठ्याप्रमाणात असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे आमदार आणि खासदार एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. या मतदारसंघात निवडणुकीसाठी यंदा कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून उभा केला जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शिवसेनेकडून निवडणुकीसाठी अनेक उत्सुक उमेदवार आहेत कोणाला उमेदवारी मिळेल हे पाहणं महत्वाचे ठरेल.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

संजय जाधव – शिवसेना – ५ लाख ७८ हजार ४५५

विजय भांबले – राष्ट्रवादी काँग्रेस – ४ लाख ५१ हजार ३००

गुलमिर खान – बसपा – ३३ हजार ७०९

नोटा – १७ हजार ४९६