२३ – भिवंडी लोकसभा मतदारसंघ

२३ – भिवंडी लोकसभा मतदारसंघ

भिवंडी लोकसभा मतदारसंघ

पूर्वीपासूनच भिवंडीचा नावलौकिक व्यापार केंद्र म्हणून राहिला आहे. पूर्वीच्या काळी बंदरगाह या बंदरामुळे या भागात व्यापार उदीम जोमाला आला. मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत देशातले सर्वाधिक कापड कारखाने आहेत. हातमाग तुलनेने नगण्य असलेल्या भिवंडीत यंत्रमाग मोठ्या संख्येने आहेत. भिवंडीतील बहुतांश रोजगार हा या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधूनच निर्माण झाला आहे. या भागात कोकणातून स्थलांतरीत झालेले कोळी बांधव देखील मोठ्या संख्येने आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मुस्लीम लोकसंख्या ६५ टक्क्यांच्या घरात असून देखील सामान्यपणे मुस्लिमांमध्ये आढळणारं साक्षरतेचं कमी प्रमाण इथे ८५% आहे. याच मुस्लिमांची ४ ते ५ लाख मतं इथल्या निकालांवर प्रभाव पाडतात. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा इथे पहिल्यापासून प्रभाव आहे. मात्र, २०१४च्या मोदी लाटेने इथे भाजपच्या गळ्यात खासदारकी टाकली. नजीकच्या भविष्यात एमएमआरडीएने भिवंडीमध्ये विकासकामं करण्याचं नियोजन केलं आहे. १९६२साली तयार झालेला हा मतदारसंघ १९७६ साली बरखास्त करण्यात आला होता. मात्र, २००९मध्ये पुन्हा तो बनवण्यात आला जेव्हा काँग्रेसच्या सुरेश तवरेंनी भाजपच्या शिवराम पाटलांचा पराभव केला.

मतदारसंघाचा क्रमांक – २३

नाव – भिवंडी

संबंधित जिल्हे – ठाणे

प्रमुख उद्योग-व्यवसाय – वस्त्रोद्योग

प्रमुख शेतीपीक – शेती नगण्य, मच्छी व्यवसाय मुबलक

शिक्षणाचा दर्जा – ८५%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – ८ लाख ४५ हजार ०४५

महिला – ३ लाख ७२ हजार ३३९

पुरुष – ५ लाख २ हजार ७०५


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

कपिल पाटील – भाजप -५ लाख २३ हजार ५८३

सुरेश काशिनाथ टावारे – काँग्रेस – ३ लाख ६७ हजार २५४

प्रो.डॉ. अरुण सावंत – वंचित बहुजन आघाडी – ५१ हजार ४५५

नितेश रघुनाथ जाधव – अपक्ष – २० हजार ६९७

नोटा – १६ हजार ३९७


विधानसभा मतदारसंघ – आमदार

१३४ – भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती) – शांताराम मोरे – शिवसेना

१३५ – शहापूर (अनुसूचित जमाती) – पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी काँग्रेस

१३६ – भिवंडी पश्चिम – महेश चौघुले – भाजप

१३७ – भिवंडी पूर्व – लक्ष्मण म्हात्रे – शिवसेना

१३८ – कल्याण पश्चिम – नरेंद्र पवार – भाजप

१३९ – मुरबाड – किसन कथोरे – भाजप

भिवंडी खासदार कपिल पाटील

विद्यमान खासदार – कपिल पाटील, भाजप

२०१४च्या निवडणुकांपूर्वी कपिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील भूषवलं आहे. मात्र, आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसला गेल्यामुळे कपिल पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत उमेदवारीसाठी भाजपचा रस्ता धरला. मोदी लाटेच्या ओढ्यामध्ये परंपरागत काँग्रेसकडे असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचं निशाण फडकलं. त्यामुळे कपिल पाटलांचा भाव चांगलाच वधारला. मोदी लाटेत कपिल पाटील तब्बल लाखभर मताधिक्याने निवडून आले. मात्र, २०१९मध्ये मोदी लाट ओसरली असताना आणि मतदारसंघातला मुस्लिम मतांचा आकडा पाहाता यंदा पुन्हा एकदा काँग्रेसच्याच गळ्यात खासदारकीची माळ पडण्याची शक्यता आहे. मनसेचाही प्रभाव २०१४च्या तुलनेने बराच कमी झाल्यामुळे इथे काँग्रेसला चांगली संधी असल्याचं बोललं जात आहे.

२०१४मधील आकडेवारी –

कपिल पाटीलभाजप – ४ लाख ११ हजार ०७०

विश्वनाथ पाटील काँग्रेस – ३ लाख १ हजार ६२०

सुरेश म्हात्रेमनसे – ९३ हजार ६४७

मधुकर पाटीलभाकप – १३ हजार ७२०

नोटा ९ हजार ३११

मतदानाची टक्केवारी५१.६२%

First Published on: February 22, 2019 10:25 PM
Exit mobile version