२९ – मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघ

२९ – मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघ

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघ

कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्याशी बांधील न राहणारा मतदार असलेला हा मतदारसंघ आहे. १९६२ सालापासून इथे झालेल्या निवडणुकांमध्ये भाकप, जनसंघ, काँग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाइं अशा सर्वच पक्षांच्या उमेदवारांना इथल्या मतदारांनी संधी दिली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या वेळी जसं आणि ज्या पक्षाच्या बाजूने वातावरण असेल, त्या पक्षाच्या पारड्यात मत टाकण्याची इथल्या मतदारांची सवय आहे. दोन मोठे रेल्वे टर्मिनस (वांद्रे, एलटीटी), मुंबईची दोन्ही विमानतळं (आंतरराष्ट्रीय, डोमेस्टिक), उच्चवर्गीय-मध्यमवर्गीय-निम्नवर्गीय अशा समाजातल्या तिन्ही वर्गातले मतदार आणि या तीन वर्गांच्या सर्व प्रकारच्या समस्या. त्यामुळे हा मतदारसंघ एका अर्थाने चॅलेंजिंग आहे. मधू दंडवते, शरद दिघे, रामदास आठवले, मनोहर जोशी, प्रिया दत्त अशा सर्वपक्षीय दिग्गज उमेदवारांना या मतदारसंघाने निवडून दिलं आहे. मात्र, तरीदेखील अजूनही या मतदारसंघातल्या मूलभूत समस्या देखील सुटल्या नाहीत हे देखील तितकंच खरं आहे.

मतदारसंघाचा क्रमांक – २९

नाव – मुंबई उत्तर-मध्य

संबंधित जिल्हे – मुंबई उपनगर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – घरगुती उद्योग, नोकरदार वर्ग

प्रमुख शेतीपीक – NA

शिक्षणाचा दर्जा – ८०%

महिला – ८३%

पुरुष – ८७%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – ८ लाख ४४ हजार ८६७

महिला मतदार – ३ लाख ७२ हजार ८५७

पुरुष मतदार – ४ लाख ७२ हजार १०


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल 

पूनम महाजन – भाजप – ४ लाख ८६ हजार ६७२

प्रिया सुनिल दत्त – काँग्रेस – ३ लाख ५६ हजार ६६७

अब्दुर रेहमान अन्जारिया – वंचित बहुजन आघाडी – ३३ हजार ७०३

नोटा – १० हजार ६६९


विधानसभा मतदारसंघ – आमदार

१६७ – विले-पार्ले – पराग अळवणी, भाजप

१६८ – चांदिवली – नसीम खान, काँग्रेस

१७४ – कुर्ला (अ.जा) – मंगेश कुडाळकर, शिवसेना

१७५ – कलिना – संजय पोतनीस, शिवसेना

१७६ – वांद्रे पूर्व – प्रकाश(बाळा) सावंत, शिवसेना

१७७ – वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप


भाजर खासदार पूनम महाजन

विद्यमान खासदार – पूनम महाजन, भाजप

२०१४ साली आलेली मोदी लाट आणि दिवंगत लोकनेते प्रमोद महाजन यांची मुलगी या दोन्ही गोष्टींचा फायदा पूनम महाजन यांना झाला. काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा सुमारे २ लाख मतांनी त्यांनी पराभव देखील केला. मात्र गेल्या ४ वर्षांत त्यांना मतदारसंघातल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा मात्र काढता आलेला नाही. त्यामुळे स्थानिक मतदार अँटी इन्कम्बन्सी मोडमध्ये गेल्यास यंदाची निवडणूक पूनम महाजन यांच्यासाठी कठीण जाऊ शकते. शिवाय, शिवसेनेचं पाठबळ जरी असलं, तरी मोदी लाटेच्या अभावी या लहरी मतदार संघातून निवडून येणं कठीण असेल.

२०१४मधील आकडेवारी

पूनम महाजन – भाजप – ४ लाख ७८ हजार ५३५

प्रिया दत्तकाँग्रेस – २ लाख ९१ हजार ७६४

फिरोझ पालखीवालाआप – ३४ हजार ८२४

नोटा६ हजार ९३७

First Published on: March 1, 2019 6:40 PM
Exit mobile version