१० – नागपूर लोकसभा मतदारसंघ

१० – नागपूर लोकसभा मतदारसंघ

१० - नागपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. हा नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून, भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. देशच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. या जिल्ह्यात नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, कळमेश्वर, नरखेड, काटोल, पारशिवनी, रामटेक, हिंगणा, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, सावनेर हे तालुके आहेत.

मतदारसंघाचा क्रमांक – १०

नाव – नागपूर

संबंधित जिल्हा – नागपूर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

प्रमुख शेती पीक – ऊस, गहू, संत्री, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, सुर्यफूल, कापूस

शिक्षणाचा दर्जा – ८९.२५ टक्के


मतदारसंघ राखीव – खुला

एकूण मतदार – १० लाख ८३ हजार ६०४

महिला – ५ लाख ०४ हजार ८५०

पुरुष – ५ लाख ७८ हजार ७५४


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

नितीन गडकरी – भाजप – ६ लाख ६० हजार २२१

नाना पटोले -काँग्रेस – ४ लाख ४४ हजार २१२

मोहम्मद जमाल -बहुजन समाज पार्टी – ३१ हजार ७२५

मनोहर डबरासे – वंचित बहुजन आघाडी – २६ हजार १२८


नागपूर विधानसभा मतदारसंघ

नागपूर जिल्हा

५२ नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस, भाजप

५३ नागपूर दक्षिण – दिनानाथ पडोळे, काँग्रेस

५४ नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे, भाजप

५५ नागपूर मध्य – विकास कुंभारे, भाजप

५६ नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख, भाजप

५७ नागपूर उत्तर (SC) – डॉ. नितीन राऊत, काँग्रेस


नितीन गडकरी, भाजप

विद्यमान खासदार – नितीन गडकरी, भाजप

नितीन जयराम गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६ व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५,८७,७६७ मते मिळाली. तर प्रतिस्पर्ध्यास ३,०२,९३९ मते मिळाली. नितीन गडकरी सध्या केंद्राती मंत्री असून राज्यातील एक ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधानासाठीचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यांच्याच विधानसभा मतदारसंघातील एक आमदार आहेत.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

नितीन गडकरी, भाजप – ५ लाख ८७ हजार ७६७

विलास मुक्तामवार, काँग्रेस – ३ लाख ०२ हजार ९३९

डॉ. मोहन गाकवाड, बसपा – ९६ हजार ४३३

नोट – ३ हजार ४५२

मतदानाची टक्केवारी – ५७.०८ टक्के

First Published on: February 22, 2019 5:08 PM
Exit mobile version