२१ – नाशिक लोकसभा मतदारसंघ

२१ – नाशिक लोकसभा मतदारसंघ

नाशिक लोकसभा मतदारसंघ

नाशिक हा मतदारसंघ प्रामुख्याने नाशिक शहरातल्या द्राक्ष बागायतींसाठी ओळखला जातो. त्याशिवाय आसपासच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गुलाबाच्या शेतीमुळे गुलशनाबाद म्हणूनही नाशिकची ओळख आहे. कुंभमेळा आणि नाशिक शहरातल्या आध्यात्मिक ठिकाणांमुळे नाशिकची ओळख देशभरात पोहोचली आहे. नाशिक मतदारसंघात प्रामुख्याने शेतीबहुल क्षेत्र अधिक येत असल्यामुळे तिथे शेतीविषयक धोरणांचा मोठा परिणाम जाणवतो. तसेच, नाशिक स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर देखील आता समस्या आणि त्यांच्या उपायांची चर्चा महत्त्वाची ठरत आहे. इगतपुरी, सिन्नर आणि देवळाली हे विधानसभा मतदारसंघ मूळ शहरापासून लांब असले, तरी तिथल्या स्थानिक राजकारणाचा प्रभाव नाशिक लोकसभा मतदारसंघातली गणितं फिरवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.

मतदारसंघाचा क्रमांक – २१

नाव – नाशिक

संबंधित जिल्हे – नाशिक

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, वायनरी, फूड प्रोसेसिंग

प्रमुख शेतीपीक – द्राक्ष, डाळिंब, मका, ज्वारी

शिक्षणाचा दर्जा – ६४ %


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – १३ लाख ८५ हजार ६१४

महिला – ६ लाख ८६ हजार ८५३

पुरुष मतदार – ६ लाख ९८ हजार ६१७


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

हेमंत गोडसे – शिवसेना – ५ लाख ६३ हजार ५९९

समीर भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ७१ हजार ३९५

अॅड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे – अपक्ष – १ लाख ३४ हजार ५२७

पवन चंद्रकांत पवार – वंचित बहुजन आघाडी – १ लाख ९ हजार ९८१

नोटा – ६ हजार ९८०


विधानसभा मतदारसंघ

१२० – सिन्नर – प्रकाश वाजे – शिवसेना

१२३ – नाशिक पूर्व – महादू सानप – भाजप

१२४ – नाशिक मध्य – देवयानी फरांदे – भाजप

१२५ – नाशिक पश्चिम – सीमा हिरे – भाजप

१२६ – देवळाली (अनुसूचित जाती) – योगेश घोलप – शिवसेना

१२७ – इगतपुरी (अनुसूचित जमाती) – निर्मला गावीत – राष्ट्रवादी काँग्रेस


 

खासदार हेमंत गोडसे अनेकदा शिवसेना स्टाईलमध्ये आक्रमक होताना दिसले आहेत

विद्यमान खासदार

हेमंत गोडसे, शिवसेना

२००९मध्ये हेमंत गोडसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर नाशिकमधूनच निवडणूक लढवली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ यांनी २४ हजारांच्या मताधिक्याने त्यांचा परभव केल्यानंतर त्यांनी शिवसेनेची वाट धरली. शिवसेनेचं तिकीट त्यांना पावलं आणि २०१४मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टालवर्ट उमेदवार छगन भुजबळ यांचा तब्बल १८ हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे हेमंत गोडसेंचा मोठा प्रभाव या मतदारसंघावर असल्याचं बोललं जात आहे. २००७ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेपासून त्यांच्या प्रत्यक्ष राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. २०१२मध्ये नाशिक महानगर पालिकेवर देखील ते निवडून गेले होते.


२०१४मधील आकडेवारी

हेमंत गोडसेशिवसेना – ४ लाख ९३ हजार ६०५ मतं

छगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेस – ३ लाख ६ हजार ७२६ मतं

डॉ. प्रदीप पवारमनसे – ६२ हजार ९३६ मतं

दिनकर पाटीलबसप – २० हजार ८८३

First Published on: February 19, 2019 4:46 PM
Exit mobile version