८ – वर्धा लोकसभा मतदारसंघ

८ – वर्धा लोकसभा मतदारसंघ

वर्धा लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

वर्धा या मतदारसंघामध्ये सध्या वर्धा जिल्ह्यामधील ४ व अमरावती जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. वर्धा शहरात सर्वच धर्म-संस्कृतींचे लोक आढळतात. येथे हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांची संख्या तुलनेने जास्त असली तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथाचे नागरिक ही येथे आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषा बोलली जाते. काही प्रमाणात गुजराती सिंधी आणि पंजाबी या भाषाही बोलल्या जातात. जिल्ह्यात कारंजा, सेलू, आर्वी या भागात प्रामुख्याने आदिवासी लोक राहतात.

मतदारसंघाचा क्रमांक – ८

नाव – वर्धा

संबंधित जिल्हे – अमरावती आणि वर्धा

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, कापूस

प्रमुख शेती पीक – ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग, गहू, हरभरा, सोयाबीन, तूर


मतदारसंघ राखीव – खुला

एकूण मतदार – १० लाख २१ हजार १७८

महिला – ४ लाख ५८ हजार ६७४

पुरुष – ५ लाख ५३ हजार ५०४


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

रामदास तडस – भाजप – ५ लाख ७८ हजार ३६४

चारूलता टोकस – काँग्रेस – ३ लाख ९१ हजार १७३

धनराज वंजारी – वंचित बहुजन आघाडी – ३६ हजार ४५२

शैलेशकुमार अग्रवाल – बहुजन समाज पार्टी -३६ हजार ४२३


वर्धा विधानसभा मतदारसंघ

अमरावती जिल्हा

३६ धामणगाव रेल्वे – विरेंद्र जगताप, काँग्रेस

४३ मोर्शी – अनिल बोंडे, भाजप

वर्धा जिल्हा

४४ आर्वी – अमर काळे, काँग्रेस

४५ देवळी – सुरेश वाघमारे, भाजप

४६ हिंगणघाट – समीर कुणावार, भाजप

४७ वर्धा – पंकज भोयर, भाजप


रामदास तडस, भाजप

विद्यमान खासदार – रामदास तडस, भाजप

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांनी काँग्रेसच्या मेघा दत्तात्रय यांचा २ लाख मतांनी पराभव केला.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

रामदास तडस, भाजप – ५ लाख ३७ हजार ५१८

मेघा दत्तात्रय, काँग्रेस – ३ लाख २१ ७३५

चेतन पेंडम, बसपा – ९० हजार ८६६

नोट – ३ हजार ३३८

मतदानाची टक्केवारी – ६४.७८ टक्के

First Published on: February 21, 2019 9:50 PM
Exit mobile version