१४ – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ 

१४ – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ 

यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

यवतमाळ जिल्हा हा विदर्भ विभागात येतो. यवतमाळ हा ब्रिटिश राजवटीत वणी जिल्ह्याचा प्रमुख भाग होता. मात्र १९०५ साली वणीचे यवतमाळ नामकरण झाले आणि यवतमाळ जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. यवतमाळ जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३ हजार ५८४ चौसर किमी आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २७ लाख ७५ हजार ४५७ ऐवढी आहे. यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये शेती व्यवसाय केला जातो. या जिल्ह्यात हातविणकाम, विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग आणि तेल उद्योग असे उद्योग आहेत. या जिल्ह्यात एकूण १६ तालुके आहेत. या जिल्ह्यातील ९५ टक्के गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती आहे.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील विदर्भ विभागात येतो. वाशिम जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ४ आणि वाशिम जिल्ह्यातील २ असे एकूण मिळून ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची २००८ साली निर्मिती झाली आहे. शिवसेनेच्या भावना गवळी या या मतदारसंघाच्या खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम विधानसभा मतदारसंघात ४ ठिकाणी भाजपची सत्ता आहे. तर एका ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

मतदारसंघ क्रमांक – १४

नाव – यवतमाळ-वाशिम

संबंधित जिल्हे – यवतमाळ, वाशिम

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती आणि उद्योग

प्रमुख शेतीपीक – ज्वारी, कापूस, सोयाबिन, तूर

शिक्षणाचा दर्जा –

यवतमाळ – ८०.७ टक्के

वाशिम – ८१.७ टक्के

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – १७ लाख ५४ हजार २३८

महिला-पुरुष मतदार

पुरुष – ९ लाख २० हजार ५१७

महिला – ८ लाख ३३ हजार ७१५


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

भावना गवळी – शिवसेना – ५ लाख ४२ हजार ०९८

माणिकराव ठाकरे -काँग्रेस- ४ लाख २४ हजार १५९

प्रविण पवार – वंचित बहुजन आघाडी – ९४ हजार २२८

परश्राम अदे – अपक्ष – २४ हजार ४९९

वैशाली येडे – प्रहार जनशक्ती पार्टी – २० हजार ६२०


यवतमाळ-वाशिम विधानसभा मतदारसंघ

३४ – वाशिम (अनुसुचित जाती) – लखन मलिक, भाजप

३५ – कारंजा – राजेंद्र पाटणी, भाजप

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ –

७७ – राळेगांव (अनुसुचित जमाती) – अशोक उईके, भाजप

७८ – यवतमाळ – मदन येरावार, भाजप

७९ – दिग्रस – संजय राठोड, शिवसेना

८१ – पुसद – मनोहर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस


विद्यमान खासदार – भावना गवळी

विद्यमान खासदार – भावना गवळी, शिवसेना

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार आहेत. भावना गवळी या माजी खासदार पुंडलीकराव गवळी यांच्या कन्या आहेत. पुंडलीकरवा गवळी यांच्या राजकारणाचा वारसा भावना गवळी यांनी कायम राखला आहे. जनसंपर्काच्या बळावर खासदार भावना गवळी या ४ वेळा या मतदारसंघाच्या खासदार राहिल्या आहेत. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नेते अनंतराव देशमुख यांचा पराभव करत विजय मिळवला होता. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर नाईक याचा पराभव करत त्या दुसऱ्यांदा खासदार झाल्या. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या हरिभाऊ राठोड यांचा पराभव करत तिसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांचा पराभव करत चौथ्यांदा खासदार झाल्या. २० वर्षाच्या कार्यकाळात खासदार भावना गवळी यांनी चांगली कामगिरी केली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देखील त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

भावना गवळी – शिवसेना – ४ लाख ७७ हजार ९०५

शिवाजीराव मोघे – काँग्रेस, ३ लाख ८४ हजार ८९

बळीराम राठोड – बसपा, ४८ हजार ८९५

First Published on: February 26, 2019 4:26 PM
Exit mobile version