एप्रिल महिन्यात होणार ‘हे’ मोठे बदल: सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर

एप्रिल महिन्यात होणार ‘हे’ मोठे बदल: सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर

1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार

एप्रिल महिना आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. नवीन आर्थिक वर्षही याच महिन्यात सुरू होते. अशा परिस्थितीत यासोबतच असे अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एप्रिल महिन्यात होणा-या आर्थिक बदलांबद्दल जाणून घेऊया.

6 अंकी हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या विक्रीवर बंदी  

1 एप्रिल 2023 पासून भारतात सोन्याच्या विक्रीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. 1 एप्रिलपासून ज्वेलर्स फक्त तेच दागिने विकू शकतील ज्यावर 6 अंकी HUID क्रमांक नोंदणीकृत असेल. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक विभागाने 18 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय घेतला आहे. पूर्वी HUID ऐच्छिक होता.

अनेक कंपन्यांच्या गाड्या महाग होणार आहेत

भारत स्टेज-2 च्या अंमलबजावणीमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, टोयोटा आणि ऑडी यांसारख्या अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या किमती वाढणार आहेत. सर्व कंपन्यांनी 1 एप्रिल 2023 पासून त्यांचे नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नियमाप्रमाणे दर महिन्याच्या सुरुवातीला LPG आणि CNG चे दरही निर्धारित केले जाणार आहेत. त्यामुळे देखील दरांत बदल होऊ शकतात.

जास्त प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींवर कर भरावा लागणार

तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम पॉलिसी खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती की 1 एप्रिल 2023 पासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. त्यामुळे 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक प्रिमियम पाॅलिसी असलेल्यांना कर भरावा लागणार आहे.

( हेही वाचा: द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करून 1 कोटी 10 लाख लुटले; वाचा, कुठे घडली ही घटना )

एप्रिल महिन्यात 15 दिवस बॅंका बंद

एप्रिल महिन्यात बॅंक कर्मचा-यांची चांदी आहे. कारण एकदोन नव्हे तब्बल 15 दिवस बॅंकांना विविध कारणांनी सुट्ट्या मिळणार आहेत. तेव्हा बॅंकांची कामे ताबडतोब उरकून घ्या.

दिव्यांगजनांसाठी यूडीआयडी अनिवार्य

आता १ एप्रिलपासून दिव्यांगांना युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (यूडीआयडी) क्रमांक सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे UDID नाही, त्यांना त्यांच्या UDID नावनोंदणी क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानंतरच तो 17 सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो.

First Published on: March 29, 2023 10:04 AM
Exit mobile version