राज्यात १ हजार १८९ कोरोना बाधितांची नोंद, तर एका रुग्णाचा मृत्यू

राज्यात १ हजार १८९ कोरोना बाधितांची नोंद, तर एका रुग्णाचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार १८९ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे. तर आतापर्यंत राज्यात ७९ लाख १३ हजार २०९ इतके रुग्ण बरे होऊन घरे परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१ टक्के इतकं झालं आहे.

राज्यात आतापर्यंत १२ हजार १४८ इतके रुग्ण संख्या आढळून आली आहे. तर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईत ५ हजार २१८ इतके कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यात १ हजार ९६० रुग्ण सक्रिय आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत ५८४ इतके नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ तासांत ४०७ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७.८ टक्के इतका आहे.

मुंबईत बरे झालेले एकूण रुग्ण ११०८२९० इतके आहेत. कोरोना रुग्णाच्या दुप्पटीचा दर ११०१ इतके दिवस आहे. तर कोविड वाढीचा दर ८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट ०.०६२ टक्के इतका आहे.

देशात १४ हजार ९१७ नवीन रुग्ण

देशात दिवसभरात १४ हजार ९१७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. काल दिवसभराच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या ८२५ रुग्णांची वाढ झाली आहे. शनिवारी १४,०९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे.


हेही वाचा : काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये करू शकता, अजित पवारांची कोपरखळी


 

First Published on: August 15, 2022 7:24 PM
Exit mobile version