धक्कादायक! पिंपरी – चिंचवडमध्ये १०८ नवे कोरोना रुग्ण

धक्कादायक! पिंपरी – चिंचवडमध्ये १०८ नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर पिंपरी – चिंचवड शहरात सर्वाधिक १०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर दापोडी येथील ६५ वर्षीय, दिघी येथील ४३ वर्षीय आणि शिरपूर धुळे येथील ६६ वर्षीय पुरुषांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

१ हजार २५ जणांना सोडले घरी

दरम्यान, पिंपरी – चिंचवड शहरात आज ९५ जण करोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत १ हजार २५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत ४७ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे. तर शहरातील एकूण बाधितांची संख्या १ हजार ४७४ पोहचली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात तब्बल ३ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मिशन बिगीन अगेनच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे दररोज मोठ्या संख्येने नवे कोरोना रुग्ण देखील सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनासमोरचं आव्हान कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आज राज्यात तब्बल ३ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २० हजार ५०४ इतका झाला आहे. यापैकी ५३ हजार ९०१ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६० हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. मात्र असं असलं, तरी आज दिवसभरात राज्यात १०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ हजार ७५१ च्या घरात पोहोचला आहे.


हेही वाचा – रुग्णसंख्येत नाशिक मालेगावच्या पुढे


First Published on: June 18, 2020 11:36 PM
Exit mobile version