राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफांच्या घरी ईडीची 12 तास चौकशी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफांच्या घरी ईडीची 12 तास चौकशी

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाड टाकली होती. हसन मुश्रीफांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने छापे टाकले. तब्बल 12 तासा चौकशी केल्यानंतर नुकताच ईडीचे अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर निघाले. तसेच, या चौकशीवेळी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिल्याची माहिती हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ याने दिली. (12 hours of ED interrogation at the house of senior NCP leader Hasan Mushrif)

ईडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर नाविद मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “ईडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीला आम्ही योग्य तो प्रतिसाद दिला. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरही दिली. राजकीय हेतून आज ईडीने मुश्रीफांच्या घरी छापेमारी केली. सकाळी 7 वाजता ईडीचे अधिकारी आमच्या घरी आले होते. तब्बल 12 तास झालेल्या चौकशीमध्ये मी त्यांनी मला विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिली”, असे नाविद मुश्रीफ यांनी सांगितले.

“ईडीचे अधिकारी सकाळी साधारण सात वाजता आले होते. जोपर्यंत आमच्या पाठीशी जनता आहे, तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांना वरून फोन येत होते. त्याप्रमाणे ते कारवाई करत होते. ज्यांनी आमच्याविरोधात कारवाईचे षडयंत्र रचले, त्यांना जनता उत्तर देईल. आमच्यावर कारवाई होणार, हे मागील चार दिवसांपासून आमच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येत होते. ही कारवाई राजकीय हेतू ठेवून करण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांवर दबाव होताच” असेही नावीद मुश्रिफ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी ईडीने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही होते. ईडीचे जवळपास 20 अधिकारी सकाळी 7 वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले. सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते. यावेळी मुश्रीफांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दररोज जनता दरबार भरतो. विविध कामांसाठी लोकांची गर्दी त्यांच्या घरी जमते. मात्र, लोक येण्यापूर्वीच ईडीने निवासस्थानाचा ताबा घेतला होता. याची माहिती मिळताच कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच, ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे.

पुण्यातील कोंढवा येथील अशोका मुज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला आहेत. तसेच, मुश्रीफ यांच्या कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

नमके प्रकरण काय?

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. 2020 साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरीही या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपद धोक्यात? वाचा नेमके काय घडणार…

First Published on: January 11, 2023 7:59 PM
Exit mobile version