नाशिक शहरात १२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक शहरात १२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, बुधवारी (दि.१०) दिवसभरात १२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये लेखानगर १, भवानीरोड, नाशिक रोड १, बडी दर्गा १, बजरंगनर, आनंदवली १, भद्रकाली १, अंबड लिंक रोड, सातपूर १, अजमेरी चौक २, भाभानगर २, सुभाष रोड व अशोका मार्ग येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७०८ रूग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात ४९९ बाधित आहेत. शहरात एकूण १०३ प्रतिबंधित क्षेत्र आहे. १८३ रूग्ण करोनामुक्त झाले असून २८४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

जुने नाशकातील वयोवृध्दाचा मृत्यू
जुने नाशिक, नाईकवाडी पुरा येथील ६५ वर्षीय वृद्ध ५ जून रोजी उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांचे आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील ५ बाधित
शहरात पाच बाधित रूग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. भद्रकाली फ्रुट मार्केट परिसरातील ६२ वर्षीय महिला करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आदर्श सोसायटी, लेखा नगर, सिडको येथील ६१ वर्षीय वृद्ध यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आलेला आहे. जय भवानी रोड, जाचक नगर, नाशिक येथील ४१ वर्षीय पुरुष करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. बडी दर्गा समोर,उर्दू स्कूल, नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध महिला करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. सातपूर-अंबड लिंक रोड, पाटीलनगर अंबड येथील ४३ वर्षीय पुरुष करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या सर्वांवर रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रूग्ण-१७०८ (मृत-१०५)
नाशिक शहर-४९९ (मृत-२३)
नाशिक ग्रामीण-२८५ (मृत-१२)
मालेगाव शहर-८५८ (मृत-६४)
जिल्ह्याबाहेरील-६९ (मृत-६)

First Published on: June 10, 2020 8:41 PM
Exit mobile version