Naxals clash: गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान; अद्याप सी-60 पोलीस पथकाची चकमक सुरूच

Naxals clash: गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान; अद्याप सी-60 पोलीस पथकाची चकमक सुरूच

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात सकाळपासूनच चकमक सुरू आहे. नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या या चकमकीत सी-६० पोलीस पथकाने १३ नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांकडून दोन तासापासून चकमक सुरु होती. यादरम्यान पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात आल्याने हे पोलिसांचे मोठे यश मानले जाते. कसनासूर चकमकीनंतरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. २०१८ मध्ये ४० माओवादी कसनासूर चकमकीत ठार करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी महाराष्ट्र पोलिसांच्या सी ६० कमांडो पथकाने ही मोठी कारवाई केली. ही कारवाई सकाळी सुरू झाल्यानंतर ८ ते १० नक्षलवाद्यांना ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हा आकडा १३ वर गेल्याची अधिकृत माहिती समोर आली.

गडचिरोलीचे डीआईजी संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना १३ जणांना कंठस्थान घालण्यात यश मिळाले असून एटापल्लीच्या जंगलातून नक्षलवाद्यांचे ६ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. क्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर गेल्या महिन्यात ग्रेनेड टाकला होता. त्याचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जात आहे.

 

First Published on: May 21, 2021 1:43 PM
Exit mobile version