कोकण विभागात सरासरी १३०.८० मिमी पावसाची नोंद

कोकण विभागात सरासरी १३०.८० मिमी पावसाची नोंद

प्रातिनिधिक फोटो

ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून मुंबई ठाण्यासह कोकण परिसराला पावसाने चांगलेच झोपडून काढले आहे. कोकण विभागात सरासरी १३०. ८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्हयातील माथेरान तालुका येथे ३४७. ०० मि.मी. पावसाचे नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने गुरूवार रात्रीपासून हजेरी लावली. गुरूवारपासून सुरू झालेला पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे. मुंबई ठाणे आणि रायगड जिल्हयात मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबई शहर- ८१.२० मि.मी., मुंबई उपनगर- २३४. ८० मि.मी., ठाणे- १९०. ९४ मि.मी., पालघर- ७२. ६३ मि.मी, रायगड- १९७. ४६ मि.मी., रत्नागिरी-११२.४४ मि.मी., सिंधुदुर्ग- १००. ६३ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल १ हजार ३३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भिवंडी, कल्याण, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये २०० मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. ठाणे- २२८ मिमी, कल्याण- २३८ मिमी, मुरबाड- ५५ मिमी, उल्हासनगर- २०८ मिमी, अंबरनाथ- १८७ ४० मिमी, भिवंडी- २५० मिमी तर शहापूरमध्ये १७० मिमी. अशी पावसाची नोंद झाली आहे.

धरण क्षेत्रातील आजचा पाऊस

भातसा : १७० मि.मी.
धामणी : १६१ मि.मी.
कवडास : १६१ मि. मी.
वांद्री : २७६ मि. मी.
आंध्रा : १५६ मि. मी.
मोडकसागर : ११९ मि. मी.
तानसा : १२७ मि. मी.
बारवी : १७१ मि. मी.

First Published on: July 1, 2019 7:15 PM
Exit mobile version