आमदार बच्चू कडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजकीय आंदोलन प्रकरणात दाखल झाला होता गुन्हा

आमदार बच्चू कडूंना १४ दिवसांची  न्यायालयीन कोठडी, राजकीय आंदोलन प्रकरणात दाखल झाला होता गुन्हा

बच्चू कडू

मुंबई – आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. राजकीय आदोलन केल्याप्रकरणात गिरगावा कोर्टाने बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळला असून न्यायालयाने बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणात बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यालयाने बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढला होता. यानंतर बच्चू कडू यांनी आज न्यायालायासमोर हजर होत जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालायने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

First Published on: September 14, 2022 2:09 PM
Exit mobile version