रुग्णसंख्येत नाशिक मालेगावच्या पुढे

रुग्णसंख्येत नाशिक मालेगावच्या पुढे

रुग्णसंख्येत मालेगाव नाशिकच्या अनेक पटीने पुढे असताना गेल्या काही दिवसांपासून मात्र नाशिक शहरातील रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. परिणामी गुरुवारी (दि. १८) नाशिकने मालेगावला मागे टाकल्याचे धक्कादायक चित्र बघायला मिळाले. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात 148 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण २१, नाशिक शहर 116 मालेगाव 11 आणि जिल्ह्याबाहेरील २ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पाच बाधितांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहर २, मालेगाव २ आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ४22 करोनाबाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात 977 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनास तीन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात दुपारी १.२५ वाजता नाशिक जिल्ह्यातील ७८ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १९ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात मालेगाव १०, सिन्नर, चांदवड, इगतपुरी येथील प्रत्येकी दोन आणि जाखोरी नाशिकरोड, देवळाली, पिंपळगाव बसवंत, निफाड, निळवंडी (ता.दिंडोरी), मनमाड, येवला, घोटी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात सायंकाळी ६.३० वाजता मालेगावातील ७६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २६ वर्षीय महिला व २४ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आहे. तिसर्‍या टप्प्यात सायंकाळी ७.३० वाजता नाशिक शहरातील ३६ अहवाल प्राप्त झाले. जिल्ह्यात एकूण २ हजार ३४० बाधित रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तरी आरोग्य विभागाने वेळेत उपचार केल्याने १ हजार ४९० रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २६०, नाशिक शहर ४०४, मालेगाव ७६९, जिल्ह्या बाहेरील ५७ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक शहरातील रूग्ण असे…
कोकणीपुरा १, वृंदावन कॉलनी १, फुलेनगर १, संभाजी चौक १, पखाल रोड १, पेठ रोड २, कथडा १, सावरकरनगर १, टिळकवाडी आरटीओ १, उंटवाडी १, चौक मंडई १, राका कॉलनी १, मखमलाबाद १, ओमनगर ४, उत्तमनगर १, गंजमाळ १, दत्तनगर ९, पेठफाटा १, जुने नाशिक २, शालिमार १, पंजाब कॉलनी १.

५०५ अहवाल प्रलबित
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात १६ हजार ६५८ संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता २ हजार ३४० रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले असून ५०५ रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ६६, नाशिक शहर २९१, मालेगाव १४८ रूग्णांचा समावेश आहे.

१६८ रूग्ण दाखल
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १६८ संशयित रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले. यामध्ये जिल्हा रूग्णालय ५, नाशिक महापालिका रूग्णालय ८७, मालेगाव रूग्णालय ९, नाशिक ग्रामीण रूणालय ५७ रूग्ण दाखल झाले आहेत.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण-2422

नाशिक ग्रामीण-४६२ (मृत-२०)

नाशिक शहर-977 (मृत-४८)

मालेगाव-९०३ (मृत-६९)

अन्य-७८ (मृत-१०)

First Published on: June 18, 2020 10:25 PM
Exit mobile version