जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर एसटीला अपघात; १५ विद्यार्थी तर ३ शिक्षक जखमी

जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर एसटीला अपघात; १५ विद्यार्थी तर ३ शिक्षक जखमी

जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर एसटीला अपघात

जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला आज पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसमधील १५ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षक आणि चालक जखमी झाले आहेत. विद्यार्थी सहलीवरुन परतत असताना तळेगाव दाभाडे परिसरात हा अपघात झाला असून रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रॅक्टरला बसने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमध्ये जखमी झालेल्याना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

असा घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सर्व विद्यार्थी अलिबाग, महाबळेश्वर अशी पर्यटन स्थळे करून पुण्याच्या दिशेने बस जात होती. बसमध्ये ऐकूण ४४ विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. संगमनेरमधील बी. जे. खताळ शाळेचे विद्यार्थी सहल संपवून परतत असताना पहाटे चारच्या सुमारास एसटी तळेगाव दाभाडे परिसरात पोहोचली. दरम्यान, एसटीने रसत्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, १५ विद्यार्थी, ३ शिक्षक आणि चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. तर सर्व जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्यानंतर ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पसरला असल्याने महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.


हेही वाचा – आज सकाळी ९.४५ ते १.४५ कल्याण – डोंबिवली मेगाब्लॉक


 

First Published on: December 25, 2019 8:42 AM
Exit mobile version