कोल्‍हापूरमध्ये ट्रॅव्हल्‍समधून १९ लाखाची रोकड जप्त

कोल्‍हापूरमध्ये ट्रॅव्हल्‍समधून १९ लाखाची रोकड जप्त

प्रातिनिधिक छायाचित्र

निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गगनबावडा येथे काल, बुधवारी रात्री उशिरा गगनबावडा पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गोव्याहून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या एका खाजगी लक्झरी मधून १९ लाख ५० हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. निवडणूक काळात गैरमार्गाने आर्थिक उलाढाली होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या मार्गावर रात्रंदिवस नाका-बंदी लागू केले आहे.

परप्रांतीय तरुणाची चौकशी सुरू

आचार संहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत ३५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्यात आणखी १९ लाख ५० हजार रूपयांची भर पडली आहे. जिल्ह्यात ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या परप्रांतीय तरुणाची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून रकमेची तपशीलवार माहिती घेण्यात येत आहे. ही रक्कम कोणाकडून आणि कोणासाठी कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

First Published on: April 4, 2019 11:31 AM
Exit mobile version