प्रसूती दरम्यान अतिरक्तस्रावामुळे १९३ महिलांचा मृत्यू

प्रसूती दरम्यान अतिरक्तस्रावामुळे १९३ महिलांचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्रात प्रसूती दरम्यान अतिरक्तस्रावाच्या कारणामुळे दोन वर्षात १९३ महिलांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमने (एचएमआयएस) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही बाब उघड झाली आहे. शिवाय, दोन वर्षात ३७ महिलांचा मृत्यू मुंबईसारख्या महानगरात झाले आहेत. जिथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असलेले मोठ मोठे हॉस्पिटल्स आणि प्रसूतीगृह उपलब्ध आहेत.

१९ टक्के मृत्यू मुंबईतून

हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या आकडेवारीनुसार, सर्वात जास्त ग्रामीण भागात मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे. यात नंदूरबार आणि धुळ्यातून सर्वात जास्त केसेस आढळले आहेत. या दोन्ही शहरांशिवाय मुंबईतून १९ टक्के मृत्यू झाले आहेत. ज्यामुळे, ग्रामीण भागांसोबत शहरांमध्येही आरोग्याबाबत अनेक गोष्टींची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. प्रसूतीवेळेस महिलेला होणाऱ्या अतिरक्तस्त्रावामुळे बऱ्याचदा महिलांना जीव गमवावा लागतो. योग्य वेळी योग्य उपचारांमुळे हे मृत्यू रोखता येऊ शकतात, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात. मुंबई सारख्या शहरातही सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे, महानगरात गर्भवती महिलांच्या आरोग्याविषयी विशेष सोय आणि पद्धतींची गरज असल्याचं मत तज्ज्ञ डॉक्टर्स व्यक्त करतात.

योग्य वेळेस योग्य उपचार गरजेचं

‘आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ गायनकॉलॉजी अँड ऑब्स्ट्रिशन’ या संस्थेच्या माहितीनुसार, प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात. प्रसूती अशा हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे जिथे सर्व सुविधा उपलब्ध असतील. त्यात डॉक्टर्स, तज्ज्ञ डॉक्टर्स, औषधं आणि रक्तसाठा अशा पुरेशा सोयी असल्या पाहिजेत म्हणजे आपातकालीन परिस्थितीत महिलेचा जीव वाचवण्यास मदत होऊ शकते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महिलांना योग्य आणि पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे, अॅनेमियासारखा आजार देखील होतो.

दोन वर्षांची आकडेवारी

वर्ष           महाराष्ट्र     मुंबई
२०१८ – १९         ८५         १४
२०१८ – १७        १०८         २३
२०१७ – १६         ७९         ०५

अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहेच. याचं मुख्य कारण म्हणजे अनेकदा वेळेवर रक्त न मिळाल्यामुळेही मातेचा मृत्यू होतो. त्यासाठी, हॉस्पिटल्स आणि रक्तपेढ्यांची संख्या वाढवणं तर गरजेचं आहे असं जरी असलं तरी महिला आणि मुलींचा सर्वांगिण विकास होणं गरजेचं आहे.
– डॉ. कामाक्षी भाटे, केईएम हॉस्पिटलच्या प्रोफेसर

 

गर्भारपणात होणाऱ्या अतिरक्तस्त्रावाची कारणं

First Published on: May 10, 2019 4:13 AM
Exit mobile version