पूरग्रस्त भागातून २ लाख ३० हजार नागरिकांचं स्थलांतर, १४९ जणांचा मृत्यू

पूरग्रस्त भागातून २ लाख ३० हजार नागरिकांचं स्थलांतर, १४९ जणांचा मृत्यू

पूरग्रस्त भागातून २ लाख ३० हजार नागरिकांचं स्थलांतर, १४९ जणांचा मृत्यू

राज्यात मुसळधार पाऊसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सांगली कोल्हापूर अजूनही पाण्याखाली आहे. पूरग्रस्त भागात अजूनही मोठ्या प्रमाणा नागरिक अडकले आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने रविवारी २५ जुलै रोजी रात्री ९ वाजेपर्यंत एकूण २ लाख ३० हजार लोकांना सुखरुप बचावले असून सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं असल्याची माहिती दिली आहे. तर एकूण १४९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चिपळूणमध्ये पाण्याची पातळी ओसरली असून लोकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ९ वाजता पर्यंयत पूरग्रस्त भागातून सुमारे २ लाख ३० हजार लोकांना सुखरुपपणे बाहेर काढले आहे. तर एकूण १४९ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात तब्बल ३ हजार २४८ जनावरे दगावली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या ५० लोक जखमी अवस्थेत असून १०० लोक बेपत्ता आहेत. पूराच्या विळख्यात ८७५ गावे आली असून पाणी पातळीत अजून वाढ होत आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे,सिधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पुरपरिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. राज्यातील NDRF,SDRF,Army,Navy,Air Force च्या टिम तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात एनडीआरएफच्या २५ टिम, एसडीआरएफच्या ४ टिम, कोस्ट गार्डच्या २ टिम, आर्मीच्या ३ टिम, नेव्हीच्या ५ टिम बचावकार्यासाठी कार्यरत आहेत. चिपळूमध्ये ५ तात्पुरत्या निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. वशिष्टी नदी वरील चिपळून व मुंबईला जोडणारा पूल कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यामध्ये आलेल्या गंभीर पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येकी २ कोटी व अन्य जिल्ह्यासाठी प्रत्येकी ५० लक्ष आर्थिक मदत देण्यात आली आहे.

First Published on: July 25, 2021 10:10 PM
Exit mobile version