राज्यात २४ तासात २ हजार ३६९ नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर मुंबईतील परिस्थिती काय?

राज्यात २४ तासात २ हजार ३६९ नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर मुंबईतील परिस्थिती काय?

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात २ हजार ३६९ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासात ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात रिकव्हरी झालेल्या रूग्णांची संख्या १ हजार ४०२ इतकी आहे. तर २५ हजार ५७० रूग्ण राज्यात सक्रिय आहेत.

राज्यात सध्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्क्यांवर नोंदवण्यात आले असून, मृत्यूदर १.८५ टक्के इतका झाला. राज्यात २५ हजार ५७० सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक १२ हजार ४७९ सक्रीय रूग्ण हे मुंबईतले असून, त्यानंतर ठाण्यात ५ हजार ८७१ सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या एकूण रूग्णांपैकी १ हजार ६२ रूग्ण हे केवळ एकट्या मुंबईतील असल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. देशात सध्या ९४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत असून, २४ तासांत देशात १५ हजार २०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा : मीरा-भाईंदरमध्ये शिवसैनिकांची बंडखोरांकडे


 

First Published on: June 27, 2022 9:12 PM
Exit mobile version