Corona: राज्यात ४८ तासांत आढळले २२२ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

Corona: राज्यात ४८ तासांत आढळले २२२ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

Corona: राज्यात कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा नऊ हजारांवर!

राज्यात कोरोना व्हायरस प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. या कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभाग, पोलीस दल, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र काम करत आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी घरा बाहेर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. पण आता या कोरोना योद्धांना कोरोनाचा संसर्ग अधिकच होत आहे. राज्यात मागील ४८ तासांत २२२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत असून ३ पोलिसांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ५ हजार ९३५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४ हजार ७१५ बाधित पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे, अशी महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.

देशात आज सर्वाधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांत वाढ झाली आहे. आज देशात २६ हजार ५०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४७५ रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख ९३ हजार ८०२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २१ हजार ६०४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ३० हजार ५१९वर पोहोचला आहे आणि मृतांचा आकडा ९ हजार ६६७ झाला आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू आणि दिल्लीत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांहून अधिक आहे.


हेही वाचा – चिंताजनक! पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार पार!


 

First Published on: July 10, 2020 4:02 PM
Exit mobile version