बुलढाणा: रॉड तुटल्यामुळे बसला अपघात; २३ विद्यार्थी जखमी

बुलढाणा: रॉड तुटल्यामुळे बसला अपघात; २३ विद्यार्थी जखमी

मोताळा ते चिंचखेड चालत्या बसचा स्ट्रेअरिंग रॉड तुटल्यामुळे बुलडाण्यातील कोथली परिसरात अपघात झाला आहे. या अपघातात २३ मुलं-मुली जखमी असल्याचं समोर येत आहे. तसंच या जखमी झालेल्यामध्ये ४ ते ५ गंभीर जखमी झाले आहेत. यासर्व जखमी विद्यार्थ्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिचखेडनाथवरून मोताळ्याकडे जाणारी ही बस होती. या बसमध्ये ४० ते ४५ प्रवाशी होते.

First Published on: January 4, 2020 11:06 AM
Exit mobile version