नाशिक जिल्हा 5 हजारपार 

नाशिक जिल्हा 5 हजारपार 
नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.4) दिवसभरात 248 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात नाशिक ग्रामीण 47, नाशिक शहर 196 आणि मालेगावमधील 10 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित  रुग्णांमध्ये नाशिकच्या नाशिकरोड परिसरातील माजी महापौर बाधित आढळून आल्या आहेत. दिवसभरात 8 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात नाशिक शहर 5 आणि नाशिक ग्रामीणमधील 3 रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 30 जून ते 4 जुलै या 5 दिवसांच्या कालावधीत 1 हजार 112 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण 5 हजार 112 रुग्ण असून नाशिक ग्रामीणमध्ये 1173 आणि नाशिक शहरात 2 हजार 723 रुग्ण आहेत.
    नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे.  त्यामुळे रूग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत.  जिल्ह्यात आजवर 2 हजार 819 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 619, नाशिक शहर 1239, मालेगाव 873 आणि जिल्ह्याबाहेरील 88 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 2 हजार 23 बाधीत रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात जिल्हा रूग्णालय 85, नाशिक महापालिका रूग्णालये 1352, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 125, मालेगाव रूग्णालय 65, नाशिक ग्रामीण रूग्णालय 276 आणि गृह विलगीकरण 120 रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात 929 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 18, नाशिक महापालिका रूग्णालय 662, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 7, मालेगाव रूग्णालय 13, नाशिक ग्रामीण रूग्णालय 223, गृह विलगीकरण 6 रुग्ण आहेत.
नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-5112 (मृत-270)
नाशिक ग्रामीण-1173 (मृत-54)
नाशिक शहर-2723 (मृत-127)
मालेगाव शहर-1082 (मृत-76)
जिल्ह्याबाहेरील-134 (मृत-13)
First Published on: July 4, 2020 8:31 PM
Exit mobile version