आगीत होरपळून तीन चिमुरड्यांचा मृत्यू

आगीत होरपळून तीन चिमुरड्यांचा मृत्यू

जालन्यात होरपळून मृत्यू झालेले चिमुरडी

जनावरांसाठी बांधलेल्या गोठ्यामध्ये आग लागून तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सार्थक मारोती कोलते (६), वेदांत विष्णु मव्हारे (५) आणि संजीवनी गजानन मव्हारे (५) अशी या चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी गोठ्यातुन या चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयता शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहे. मात्र या घटनेनंतर या मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे कुटुंबीय अजूनही धक्क्यात आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कसा घडला प्रकार

जालना येथील भोकरदन या तुलक्यामध्ये ही घटना घडली आहे. हे तीघे मुले जनावरांच्या गोठ्यात खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी येथे असलेल्या सुख्या गवताने पेट घेतला. अचनाक लागलेल्या आगीमुळे ही मुले घाबरली व गोठ्यातच लपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही घटना दिसताच स्थानिकांनी अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. मात्र अग्नीशमन दल येण्या आधिच हा गोठा जळून खाक झाला होता. या घटनेत चिरड्यामुलांचे निधन झाल्यामुळे गावकऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

First Published on: February 4, 2019 5:35 PM
Exit mobile version