Kunkeshwar Jatra : कोकणातील कुणकेश्वर जत्रोत्सवानिमित्त प्रवाशांना ‘हे’ 3 दिवस मोफत ST सेवा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Kunkeshwar Jatra :  कोकणातील कुणकेश्वर जत्रोत्सवानिमित्त प्रवाशांना ‘हे’ 3 दिवस मोफत ST सेवा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Kunkeshwar Jatra : कोकणातील कुणकेश्वर जत्रोत्सवानिमित्त प्रवाशांना 'हे' 3 दिवस मोफत ST सेवा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Kunkeshwar Jatra : महाशिवरात्री निमित्त कोकणातील प्रसिद्ध सिंधुदूर्गातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर देवस्थानची जत्रा यंदा २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत साजरी करण्यात येणार आहे. कुणकेश्वराच्या जत्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक मुंबईहून कोकणात जात असतात. त्याचप्रमाणे कोकणताही विविध जिल्ह्यातील लोक ही या जत्रेला हजेरी लावत असतात. या दरम्यान यात्रेकरुंच्या प्रवासाठी गैरसोय होऊ नये यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी मोफत १० एस.टी बस फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

२८ फेब्रुवारी ते २ मार्च हे तीन दिवस तीन ठिकाणांवरुन मोफत१० एस.टी बस फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या बसेस विजदुर्ग, कणकवली आणि मालवण या तीन एसटी आगारांमधून दिवसभर कुणकेश्वर पर्यंत फेऱ्या मारणार आहेत. कुणकेश्वरच्या जत्रेसाठी येणाऱ्या भविकांना या बसेसमधून तीन दिवस मोफत प्रवास करता येणार आहे. यात्रेकरुंनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

एस.टी बसेसचे वेळापत्रक

२८ फेब्रुवारी ते २ मार्च हे तीन विजयदुर्ग, कणकवली आणि मालवण आगारातून कुणकेश्वरला १० मोफत एस.टी बसेसच्या फेऱ्या होणार आहेत.

बसचे ठिकाण आणि मार्ग

कोकणची दक्षिण काशी म्हणून देवगडमधील कुणकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. महाशिवरात्रीच्या या काळात कुणकेश्वर जत्रेत राज्यातील विविध भागातून व्यापारी सहभागी होत असतात. जत्रेत दुकाने, खेळणी, पाळणे, हॉटेल्स पाहायला मिळतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्ष कुणकेश्वरची जत्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने जत्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.


हेही वाचा –  Marathi Bhasha Din : मराठी भाषा दिन जोरदारपणे साजरा करा, राज ठाकरेंचे आवाहन

First Published on: February 20, 2022 12:34 PM
Exit mobile version