घरताज्या घडामोडीMarathi Bhasha Din : मराठी भाषा दिन जोरदारपणे साजरा करा, राज...

Marathi Bhasha Din : मराठी भाषा दिन जोरदारपणे साजरा करा, राज ठाकरेंचे आवाहन

Subscribe

२७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. हा दिवस आपण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. गौरव दिवस यापूर्वीही कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्धत मनसे पक्षाने राज्यात पहिल्यांदा सुरू केली.

Raj Thackeray Letter To MNS Party Workers : मराठी भाषा दिन जोरदारपणे साजरा करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे हे आवाहन केले आहे. २७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. हा दिवस आपण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. गौरव दिवस यापूर्वीही कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्धत मनसे पक्षाने राज्यात पहिल्यांदा सुरू केली. त्यामुळे हा गौरव दिवस जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरदार सादर व्हायला हवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी पत्रातून केले आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंनी पत्रात पुढे म्हटले आहे की, आपली भाषा म्हणून आपण आहोत. भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळे एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोदरापणे साजरा झाला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, शाहू फुले आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावकर, टिळक, अशी कितीतरी नावे आहेत ज्यांची भाषा मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा ही मराठीच अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमाने आणि त्याच उत्तुंगतेने व्हायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

त्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करा. मराठी भाषा इतक्या जोरदारपणे साजरा करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळायला पाहिले की आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. जास्तीत जास्त लोक सहभागी होतील, सोहळा जितका भव्य करता येईल तो करा आणि त्यात मराठी भाषेचे पावित्र्य राखा,राज्यात या दिवसाच्या निमित्तामने मराठीमय वातावरण निर्माण करा, असे राज ठाकरे यांनी पत्रातून मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली, अपशब्दांचा केला वापर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -