अमेरिकेतल्या ३०० कुटुंबांची महाराष्ट्राला साथ; व्हेंटिलेटर्स, धान्याची मदत!

अमेरिकेतल्या ३०० कुटुंबांची महाराष्ट्राला साथ; व्हेंटिलेटर्स, धान्याची मदत!

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबांधीत रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संकटकाळात राज्याला सर्वस्तरातून मदत निधी येत आहे. आता तर चक्क अमेरिकेतील ३०० मराठमोळ्या कुटूंबिय महाराष्ट्राच्या संकट काळात मदतीला धावून आले आहेत. राज्यातील गरजू जनतेला अन्न वितरण पासून ते रुग्णालायातील वैदयकिय साहित्य निर्मितीसाठी या महाराष्ट्रातील भूमीपुत्रांनी पुढाकार घेतला आहे. तसेच सोशल मीडियाचा माध्यमातून कोरोना संबंधित जनजागृती करत आहेत अशी माहिती दैनिक आपलं महानगरला अमेरिकेतील पोलीस दलातील आय.टी प्रकल्प व्यवस्थापक कल्याण घुले यांनी दिली आहेत.

कल्याण आसाराम घुले हे मूळचे गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथील मूळ रहिवासी असून गेल्या १५ वर्षांपासून ते अमेरिक पोलीस दलातील आय.टी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करत आहे. कल्याण यांचे  शिक्षण प्राथमिक,  घोडेगांव व गंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, अकरावी,  बारावीचे शिक्षण औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात झाले. त्यानंतर महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून २००१ मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर हैद्राबाद खासगी कंपनी नौकरी नंतर थेट अमेरिका गाठली आहे. कल्याण घुले यांना अमेरिकेचे नागरिकत्व देखील मिळाले आहे. कल्याण अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये वास्तव्यास असताना त्यांनी अमेरिकेत राहत असलेल्या जवळ जवळ ३०० मराठी कुटूंबियांच्या एकत्र करून “अल्बनी ढोले ताशा पथक” स्थापना केली आहेत. यांच्या मार्फत गेल्या काही वर्षांपासून  महाराष्ट्राची संस्कृती आणि  मराठमोळे उत्सव अमेरिकेत साजरे करते आहे. मात्र सध्या कोरोनाच्या जागतिक संकटकाळात आपल्या जन्मभूमीला मदत करावी या हेतून महाराष्ट्राच्या १२ जिल्हात गरजू नागरिकांना रेशन किट वितरित करत आहे. या रेशन किट्समध्ये तांदूळ,  डाळ, तेल अश्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. नागरिकांची १५ दिवसांची जेवणाची सोय होत आहे. यासाठी अमेरिकेतून वित्तीय मदत केली जात आहे. ही रेशन किट्स तयार करण्यापासुन  वितरित कारण्यापर्यत कल्याण घुलेचे मित्र मित्रमंडळी महाराष्ट्रात काम करत आहे.

 

व्हेंटिलेटरसाठी अमेरिकेतून प्रयत्न 

कोरोनाशी लढण्याकरिता राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. भारतात वैद्यकीय सुविधा कमी आहेत,  महाराष्ट्रात व्हेंटिलेटर कमी पडू नयेत यासाठी महाराष्ट्रातील तरुण वैज्ञानिक मिंत्र मंडळी  मुभलक दरात व्हेंटिलेटर निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या व्हेंटिलेटरला डॉक्टरांची परवानगी तसेच शासनाची मान्यता पाहिजे आहेत. त्यांनी चाचणी करून शासनाला नमुना देण्यांत आलेला असून आता फक्त  मान्यता मिळण्याची प्रतिक्षा आहे. कल्याण घुले यांनी सांगितले कि, मान्यता मिळताच ८ हजार  व्हेंटिलेटर निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्टे भागा किंवा उपकरणे या वैज्ञानिका मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, आणि न्यूयार्क या राज्यातून हे उपकरणे पाठविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

शासनाच्या आदेशाचे पालन करा

जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूचे सध्या अक्षरशः मृत्यूतांडव सुरु आहे. अमेरिकासारखा बलाढ्य देश कोरोनामुळे लॉक डाऊन आहे. कोरोनाला नियंत्रणात आण्यासाठी अमेरिकेतील सर्वयंत्रणा कामाला लागली आहे. सध्या अमेरिकेच्या तुलनेत भारतात कोरोनाचे अत्यंत कमी रुग्ण आहे. मात्र परिस्थिती खराब होण्यास वेळ लागणार नाही,  त्यामुळे नागरिकांनी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करावेत,  महाराष्ट्राचे कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत,  त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र असल्यामुळे आमचं कर्तव्य आहे कि महाराष्ट्राचा संकटकाळात जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही मदत करतो आहे. अशी प्रतिक्रिया कल्याण घुले यांनी दैनिक आपलं महानगरला दिली.


हे ही वाचा – पुणेकरांना दिलासा; पिंपरी चिंचवड शहरातच होणार कोरोनाची चाचणी


 

First Published on: May 2, 2020 6:35 PM
Exit mobile version