राज्यात ३,१०६ नवीन रुग्ण, ७५ जणांचा मृत्यू

राज्यात ३,१०६ नवीन रुग्ण, ७५ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात ३,१०६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,०२,४५८ झाली आहे. राज्यात ५८,३७६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४८,८७६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ११, नवी मुंबई मनपा ३, नाशिक ४, अहमदनगर ४, पुणे १२, सोलापूर ३, सांगली ३, औरंगाबाद ९, नागपूर ७, चंद्रपूर ६ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू औरंगाबाद ४, गोंदिया ३, सांगली ३, नागपूर २, पुणे २, सोलापूर १, वर्धा १ आणि नाशिक १ असे आहेत.

आज ४,१२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७,९४,०८० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२२,१२,३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,०२,४५८ (१५.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,९४,८१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: December 22, 2020 8:05 PM
Exit mobile version