राज्यात 3 हजार 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात 3 हजार 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

शुक्रवारी राज्यात 3 हजार 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मुंबईसह (Mumbai) राज्यभरात (Maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, महापालिका व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. (3249 new corona patients in maharashtra)

दिलासादायक म्हणजे आजची कोरोना रुग्णांची (Corona patients) आकडेवारी कालच्या आकडेवारीपेक्षा कमी आहे. त्यानुसार आज ४०० रुग्ण कमी आढळले आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत 79 लाख 79 हजार 363 कोरोनाची रुग्ण नोंदवण्यात आली आहेत. तसेच, 1 लाख 47 हजार 929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी राज्यात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने (State Health Department) ही माहिती दिली.

दरम्यान, गुरूवारी सकाळपासून मुंबईसह राज्यात पावासने जोर धरला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी अनेकांना मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांची लागण होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन केले आहे.

गुरुवारी राज्यात 3 हजार 640 रुग्ण आढळले होते. तसेच, तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.85 टक्के आहे. सध्या कोविडचे 23 हजार 996 रुग्ण उपचार घेत आहेत.


हेही वाचा – एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी

First Published on: July 1, 2022 10:36 PM
Exit mobile version