राज्यात ३,५३७ नवे रुग्ण, ७० जणांचा मृत्यू

राज्यात ३,५३७ नवे रुग्ण, ७० जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

राज्यात ३,५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,२८,६०३ झाली आहे. राज्यात ५३,०६६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,४६३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १३, ठाणे ६, नाशिक ५, अहमदनगर ३, जळगाव ५, पुणे ५, नांदेड ७, भंडारा १२ आणि नागपूर ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १९ मृत्यू भंडारा ७, नांदेड ५, ठाणे ३, पुणे २ आणि नागपूर २ असे आहेत.

आज ४,९१३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,२४,९३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२६,७२,२५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२८,६०३ (१५.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८०,६८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: December 30, 2020 7:52 PM
Exit mobile version