Corona: पुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय; पुण्यात ३८ तर पिंपरीत ४१ मृत्यू

Corona: पुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय; पुण्यात ३८ तर पिंपरीत ४१ मृत्यू

कोरोना व्हायरस

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुण्यात आज दिवसभरात १ हजार ९३८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार ३३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १५ हजार ७७० वर तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ६१ हजार २३१ वर पोहोचली आहे. दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. तर पुण्यात ३८ तर पिंपरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात ३८ जणांचा मृत्यू

पुण्यात एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे मृत्यूचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. पुण्यात आज ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज अखेर २ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर करोनावर उपचार घेणार्‍या १५७३ रुग्णांची तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९६ हजार ०५ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

पिंपरीत ४१ जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार ३३१ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार २७२ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६१ हजार २३१ वर पोहचली असून यापैकी ४६ हजार ९५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ४८६ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


हेही वाचा – Corona In Maharashtra: राज्यात २४,८८६ नव्या रुग्णांची नोंद; ३९३ बाधितांचा मृत्यू


 

First Published on: September 11, 2020 10:40 PM
Exit mobile version