राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ४५वर!

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ४५वर!

करोना व्हायरस

रत्नागिरीमध्ये पहिला करोना व्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीतील ५० वर्षांच्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण दुबईहून परतला असल्याचं समोर आलं आहे. तसंच मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमध्येही प्रत्येकी एक-एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडाव ४५वर पोहचला आहे. आजच्या एका दिवसात राज्यात चार जणांना करोनाची लागण झाली आहे.

पुण्यात आज पहिला करोना पॉझिटिव्ह आढळला. हा रुग्ण फ्रान्स आणि नेदरलँडमधून फिरुन आला होता, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. तर दुसरी मुंबईत महिला रुग्ण मुंबईत आढळली आहे. या महिलेला करोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे करोनाची लागण झाली. ही महिला घाटकोपर विभागातील असून ती ६८ वर्षांची आहे. या महिलेने आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.

त्यानंतर राज्यात तिसरा रुग्ण हा पिंपरी-चिंचवडमध्ये आढळला. २१ वर्षांचा हा करोनाग्रस्त रुग्ण असून त्याने फिलीपिन्स, सिंगापूर आणि कोलंबो या ठिकाणाहून त्याने प्रवास केला आहे. तसंच रत्नागिरीत देखील आज पहिला रुग्ण आढळला. हा आजच्या दिवसातील करोना चौथा रुग्ण आहे. त्यामुळे आपण पाहून शकता की दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे.

राज्यात करोनाची संख्या ४५वर 

पिंपरी-चिंचवड ११
पुणे ८
मुंबई ८
नागपूर ४
कल्याण ३
नवी मुंबई ३
यवतमाळ ३
ठाणे १
रायगड १
अहमनगर १
औरंगाबाद १
रत्नागिरी १


हेही वाचा – करोना अपडेट – पिंपरी चिंचवडमध्ये अजून एकाला करोनाची लागण


 

First Published on: March 18, 2020 9:36 PM
Exit mobile version