राज्य पोलीस दलातील 46 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

राज्य पोलीस दलातील 46 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

विक्रम देशमाने,अविनाश धर्माधिकारी, मिलिंद खेतले यांचा गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातील 46 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात पाचजणांना उत्कृष्ठ पोलीस सेवेसाठी तर 41 पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, अविनाश धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ शेख, पोलीस हवालदार प्रभाकर पवार, श्रीरंग सावर्डे, गणेश गोरेगावकर यांचा समावेश आहे.

पुण्यातील पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूर करवीर विभागाचे पोलीस उपअधिक्षक राजाराम रामराव पाटील, साकिनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, पुणे एसआरपीएफचे सहाय्यक कमांडर हरिश्चंद्र गोपाला काळे, कोल्हापूर विशेष गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कल्लाप्पा सूर्यवंशी या पाच पोलिसांना उत्कृष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

पोलीस दलातील गुणवत्तापूर्वक सेवेसाठी ज्या पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे त्यात ठाणे शहरातील पोलीस अधिक्षक सुरेशकुमार सावलराम मेंडगे, मुंबई झोन पाचचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक दिलीप पोपटराव बोरास्टे, नागपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नेताजी भोपाळे, ठाणे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद नामदेव हातोटे, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण विष्णू पाटील, डोंगरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी, राज्य पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोपिका शेषदास जहागीरदार, पालघरच्या डहाणू विभागाचे सहाय्यक आयुक्त मंदार वसंत धर्माधिकारी, पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लक्ष्मणराव कदम, बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली शबीरअली, नवी मुंबईच्या कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश दिंगबर गायकवाड, पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गणपत बाबर, साकिनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ गनी शेख, नागपूर पोलीस प्रशिक्षण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश दौलतराव खंडागळे, चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर अमृत यादव, पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नारायण पोळ, सोलापूर एसआरपीएफचे उपनिरीक्षक नानासाहेब विठ्ठल मिसाळ, नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ मंगलू भरसट, अमरावतीच्या पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केशवराम शेषराव टेकडे, जालना पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेशराव दासू राठोड, नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय तुकाराम उगलमुगले, पुणे विशेष शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक मनोहर लक्ष्मण चिंताल्लू, अमरावतीचे सहाय्यक उपनिरीक्षक कचरु नामदेव चव्हाण, पुणे ग्रामीण लोकल गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय गोरखनाथ जगताप, नागपूर गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक अशोक सोमाजी तिडके यांचा समावेश आहे.

यवतमाळ राज्य पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक उपनिरीक्षक सुनिल गणपतराव हराखेडे, औरंगाबाद विशेष शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक गोरख मानसिंग चव्हाण, पुणे विशेष शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक अविनाश सुधीर मराठे, मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक खामराव रामराव वानखेडे, नागपूर वाहतूक विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक नितीन रामराव शिवलकर, मुंबई राज्य गुप्तचर विभागाचे पोलीस हवालदार प्रभाकर धोंडू पवार, जालना अतिरेकीविरोधी पथकाचे अंकुश सोमा राठोड, पुणे ग्रामीण, वडगाव निंबाळकर पेालीस ठाण्याचे बाळू महिंद्र भोई, एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे श्रीरंग नारायण सावर्डे, नांदेड पोलीस मुख्यालयाचे अविनाश गोविंदराव सातपुते, परभणीच्या पुराणा पोलीस ठाण्याचे मकसूद अहमदखान पठाण, गुन्हे शाखेचे गणेश तुकाराम गोरेगावकर यांंना राष्ट्रपती पदक मिळाले आहे.

First Published on: August 15, 2019 6:38 AM
Exit mobile version