Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील नव्या रुग्णसंख्येत किंचित घट; एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नाही

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील नव्या रुग्णसंख्येत किंचित घट; एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नाही

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील नव्या रुग्णसंख्येत किंचित घट; एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नाही

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार होताना दिसत आहे. काल, बुधवारी राज्यात ४६ हजार ७२३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. मात्र आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाली असून एकही ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला नाही. गेल्या २४ तासांत राज्यात ४६ हजार ४०६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ८१ हजार ६७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ५१ हजार ८२८ सक्रीय रुग्ण आहेत.

आज दिवसभरात राज्यातील ३४ हजार ६५८ रुग्ण बरे होऊन घरी असून आतापर्यंत एकूण ६६ लाख ८३ हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी १३ लाख ५९ हजार ५३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७० कोटी ८१ लाख ६७ (९.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ९५ हजार ६३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९ हजार १२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज एकही नवीन ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली नाही. आतापर्यंत राज्यात एकूण १ हजार ३६७ ओमिक्रॉनबाधित आढळले असून ७७५ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona: पंतप्रधान मोदींच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित का राहिले नाहीत?; राजेश टोपेंनी केले स्पष्ट


 

First Published on: January 13, 2022 9:22 PM
Exit mobile version