Maharashtra Corona Update: राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर, एकूण संख्या पोहोचली ७० लाखांवर!

Maharashtra Corona Update: राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर, एकूण संख्या पोहोचली ७० लाखांवर!

Maharashtra Corona Update: राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर, एकूण संख्या पोहोचली ७० लाखांवर!

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येत होती. त्यामुळे लोकांमध्ये दिलासाचे वातावरण पसरले होते. मात्र ही घट पाहून कोरोनाचा आलेख उतरत्या दिशेला जातोय, अशा भ्रमात राहू नका, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. कारण आज कोरोनाबाधितांच्या संख्येत ४० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ४६ हजार ७२३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३२ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख पार झाली आहे. आतापर्यंत राज्यात ७० लाख ३४ हजार ६६१ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ४० हजार १२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात राज्यात २८ हजार ४१ रुग्ण बरे होऊन घरी असून आजपर्यंत एकूण ६६ लाख ४९ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५२ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ११ लाख ४२ हजार ५६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७० लाख ३४ हजार ६६१ (९.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५ लाख २९ हजार ४५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ओमिक्रॉनची परिस्थिती….

राज्यात आज दिवसभरात ८६ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. पुणे मनपात ५३, मुंबईत २१, पिंपरी चिंचवडमध्ये ६, सातारामध्ये ३, नाशिकमध्ये २ आणि पुणे ग्रामीणमध्ये १ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १ हजार ३६७ ओमिक्रॉनबाधित आढळले असून यापैकी ७३४ जण बरे होऊन घरी गेले आहेत.


हेही वाचा – Maharashtra School: राज्यातील शाळा आणखीन १५ ते २० दिवस बंद राहणार; राजेश टोपेंची माहिती


 

First Published on: January 12, 2022 9:14 PM
Exit mobile version