महाराष्ट्रात पाच लाख कोटीचे रस्ते बांधणार; केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती

महाराष्ट्रात पाच लाख कोटीचे रस्ते बांधणार; केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रात पाच लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधले आहेत. कारण राज्याचा विकास झाला पाहिजे. आम्ही देशात २० रस्ते असे बांधले आहे की ज्या रस्त्यांवर विमाने उतरू शकतील. आता केंद्र सरकारमार्फत सांगलीत लॉजीस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. त्या रस्त्यावर विमानही उतरेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे दिली.

केंद्रीय अर्थसंकल्पावर मुंबईत आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या विकास वाटा’ या विषयावरील परिसंवादात नितीन गडकरी बोलत होते. रस्ते बांधण्याच्या योजनेवर बोलताना गडकरी म्हणाले की, देशाला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ७५ टक्के लोक गावात राहत होते. मात्र आता गावात २६ टक्के लोक राहतात. गावात सोयीसुविधा आणि साधन नसल्याने नाईलाजाने लोक शहरात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागाची परिस्थिती खराब आहे, तीच परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याची आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत बेस्टसाठी इलेक्ट्रिक बस घेतल्या. तीन वर्षापूर्वी मीही प्रयत्न केले आता आदित्य ठाकरे यांनी बस घेतल्या अशा शब्दात गडकरी यांनी आदित्य यांचे कौतुक केले. इलेक्ट्रॉनिक बसला एका किलोमीटरला ५० रुपये खर्च होतो तर डिझेल बसला एका किलोमीटरला ११० रुपये खर्च होतो. माझ्याकडे इलेक्ट्रिक कार आहे. काही त्रास होत नाही, असे ते म्हणाले. आज देशात ४५० कोटी लिटर इथोनॉलची गरज आहे. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल टाकण्यासाठी देखील इथेनॉल आपल्याकडे नाही. पेट्रोलवर चालणारी वाहने आता १०० टक्के बायो इथेनॉलवर चालू शकतात.


हे ही वाचा – कायदा पाळतो याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही, शिवसैनिकांच्या राड्यावर फडणवीसांचा इशारा


 

First Published on: February 5, 2022 7:46 PM
Exit mobile version