पोलीस निरीक्षकांसह पाच पोलीस निलंबित

पोलीस निरीक्षकांसह पाच पोलीस निलंबित

सिन्नरफाटा भागात एका गुन्ह्यात तपासाकामी घरझडतीत कर्तव्यात कसूरी केल्याच्या कारणावरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकासह पाचजण निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर डोंबरे व गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी सिन्नरफाटा भागात एका गुन्ह्याच्या तपासाकामी चार दिवसांपुर्वी घरझडतीसाठी गेले असता याठिकाणी कामात कसूर केल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. ही बाब पोलीस आयुक्तांनी गांभीर्‍याने घेतली. त्यानंतर पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पातळीवर या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुधीर डोंबरे व चार पोलीस कर्मचारी यांना मंगळवारी (दि.२) रात्री उशिरा निलंबित केले. देवळाली कॅम्पमधील गोळीबार प्रकरणात पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी कामात कसूर केल्याच्या कारणास्तव पाच पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना नाशिकरोड पोलीस निलंबित झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

First Published on: June 3, 2020 11:28 AM
Exit mobile version