Nashik Corona Update : कोरोनाबाधित मृत रूग्णांचा आकडा पाचशेच्या उंबरठ्यावर

Nashik Corona Update : कोरोनाबाधित मृत रूग्णांचा आकडा पाचशेच्या उंबरठ्यावर

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि.30) दिवसभरात 5३२ नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण १०४, नाशिक शहर ४१५ आणि मालेगावमधील १३ रूग्णाचा समावेश आहे. दिवसभरात १२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहर ८, नाशिक ग्रामीण ३ आणि मालेगावमधील एका रूग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत रूग्णांचा आकडा पाचशेच्या उंबरठ्यावर आहे.

जिल्ह्यात १३ हजार ७५९ वर पोहचला आहे. एकट्या नाशिक शहरात ८ हजार 837 रूग्णांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात आजवर १० हजार 717 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण २ हजार ४74, नाशिक शहर ६ हजार 986, मालेगाव 1 हजार १२0 आणि जिल्ह्याबाहेरील १३७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 5४६ रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 875, नाशिक शहर 1 हजार 576, मालेगाव ९3 आणि जिल्ह्याबाहेरील २ रूग्ण आहेत. गुरुवारी दिवसभरात १ हजार 284 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय १८, नाशिक महापालिका रूग्णालय ८५२, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय १३, मालेगाव रूग्णालय १५, नाशिक ग्रामीण रूग्णालयात २१२ रूग्ण दाखल झाले.

नाशिक कोरोना अपडेट

पॉझिटिव्ह रूग्ण-13,759 (मृत-496)
नाशिक ग्रामीण-3465 (मृत-116)
नाशिक शहर-8837 (मृत-275)
मालेगाव शहर-1298 (मृत-85)
जिल्ह्याबाहेरील-159 (मृत-20)

First Published on: July 30, 2020 7:24 PM
Exit mobile version