राज्यात ५,३६३ नवे रुग्ण, ११५ जणांचा मृत्यू

राज्यात ५,३६३ नवे रुग्ण, ११५ जणांचा मृत्यू

राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,५४,०२८ झाली आहे. राज्यात १,३१,५४४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४३,४६३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २३, नवी मुंबई २, मीरा भाईंदर मनपा २, रायगड १, पनवेल ३, नाशिक ५, अहमदनगर मनपा २, जळगाव ३, पुणे २२, सोलापूर ४, सातारा ४, कोल्हापूर ४, जालना २, लातूर ९, नागपूर ८, वर्धा ३ आणि अन्य २ यांचा समावेश आहे. आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत १४,७८,४९६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,००,०३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,५४,०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२८,९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: October 27, 2020 7:55 PM
Exit mobile version