नाशिकमध्ये ५८ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये ५८ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

मालेगाव शहर करोना रुग्णांच्या संकटातून सावरत असताना नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनास शुक्रवारी (दि.१२) दिवसभरात ५८ नवे रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १७, नाशिक शहर ३२ व जिल्ह्याबाहेरील २ दोन रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण एक हजार ८१६ रूग्ण बाधित असून एकट्या नाशिक शहरात ५४५ रूग्ण आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रूग्ण वाढत असले तरी बाराशे रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत २१ नवे रुग्ण आढळले. यात शेनीत (ता. इगतपुरी) एक, पिंपळगाव २, माडसांगवी १, मनमाड ९, अधेंरी (मुंबई) १, येवला २, मोखाडा १, बरवीर, इगतपुरी १, निफाड १, व्दारका(नाशिक) १, नाशिकमधील एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बाधित रूग्णांमध्ये १० महिन्याच्या चिमुकलीसह ६ अल्पवयीन मुले करोनाबाधित आहेत. एकाच दिवसात सहा बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक ग्रामीण १, नाशिक शहर ३, जिल्ह्यातबाहेरील २ रूग्णांचा समावेश आहे.

१६९ संशयित रूग्ण दाखल
जिल्ह्यात शुक्रवारी १६९ संशयित रूग्णांमध्ये करोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने आरोग्य विभागाने खबर दारी म्हणून त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये जिल्हा रूग्णालय ११, नाशिक महापालिका रूग्णालय ९७, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ३, मालेगाव महापालिका रूग्णालय ३, नाशिक ग्रामीण रूग्णालय २९ रूग्ण दाखल झाले असून २० रूग्ण गृह विलगीकरण झाले आहेत.

शहरातील रूग्ण असे…
पाथर्डी फाटा २, व्दारका १, नाशिक १, आझाद चौक, जुने नाशिक २, मायको दवाखाना गल्ली नं.९, कमोद रोड, जुने नाशिक १, पंचवटी ५, कथडा १, शनी मंदिर, पेठ रोड १, नाशिकरोड १, सुभाष रोड, नाशिकरोड ४, बिटको रूग्णालयाजवळ २, बागवानपुरा ३, महाराणा प्रतापनगर, पेठरोड १, कालिकानगर, पेठरोड १.

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-1790 (मृत-११५)
नाशिक ग्रामीण-306 (मृत-14)
नाशिक शहर-571 (मृत-२९)
मालेगाव शहर-867 (मृत-६४)
जिल्ह्याबाहेरील रूग्ण-72(मृत-८)

First Published on: June 12, 2020 8:36 PM
Exit mobile version