मुंबईत दर तासाला एक करोना बळी

मुंबईत दर तासाला एक करोना बळी

राज्यात बुधवारी करोनाबाधित 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या 9915 झाली आहे. राज्यात बुधवारी एकूण 32 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातले सर्वाधिक 26 मृत्यू मुंबईत झाले आहेत. म्हणजे जवळपास तासाला एक या दराने मुंबईत करोनाबळी गेला आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण 6644 रुग्ण झाले आहेत आणि आतापर्यंत 270 करोनामृत्यू नोंदले गेले आहेत. शहरात 24 तासांत 475 रुग्णांची वाढ झाली.

बुधवारी राज्यात झालेल्या 32 करोना मृत्यूंपैकी मुंबईचे 26 सोडले तर पुणे शहरात 3, सोलापूर औरंगाबाद आणि पनवेल शहरात प्रत्येकी 1 मृत्यू नोंदला गेला आहे. आतापर्यंत 1593 रुग्णांना बरं करून घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी 205 रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज मिळाला.

बुधवारी झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड -१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे.

सध्या राज्यात 1,62,860 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 10,813 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली. आजपर्यंत 1593 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

First Published on: April 30, 2020 7:15 AM
Exit mobile version