‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर भीषण अपघात; ६ जण जखमी

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर भीषण अपघात; ६ जण जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चार तरुणांसह २ तरुणी जखमी झाल्या आहेत. जखमींना पावना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर येथील ओझर्डे गावाजवळ अपघात आज पहाटेच्या वेळेसे ही दुर्घटना घडली आहे. भरधाव कारची लोखंडी संरक्षक कठड्याला धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार तरुणांसह २ तरुणी जखमी झाल्या आहेत.

असा घडला अपघात

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर आज सकाळी एक भरधाव कार येऊन लोखंडी संरक्षक कठड्याला येऊन धडकली. या धडकेत सहा जण जखमी झाले आहेत. ओझर्डे गावाजवळ अपघात झाला असून या अपघातात नितीन सिंग (१९), आदित्य सिंग (१९), पार्थ गोगीआ (२०), अनिशा जैन (१९), बिजल (१९) आणि हर्वर्धन (२०) या जखमींना जवळील पावना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा – विमानतळावरुन एसटीची सेवा


 

First Published on: December 14, 2019 1:00 PM
Exit mobile version