आज औरंगाबाद जिल्ह्यात ६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

आज औरंगाबाद जिल्ह्यात ६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

कोरोना

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजार ८८२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३५९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजार २२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ३ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील १७ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ५१ रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर औंरगाबादमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १० जुलै ते १८ जुलै दरम्यान कडक निर्बंध लागू असणार आहेत.


हेही वाचा – देशात कोरोनाचा कहर; बाधित रुग्णसंख्येने ओलांडला ९ लाखांचा टप्पा!


 

First Published on: July 14, 2020 11:03 AM
Exit mobile version