घरCORONA UPDATEदेशात कोरोनाचा कहर; बाधित रुग्णसंख्येने ओलांडला ९ लाखांचा टप्पा!

देशात कोरोनाचा कहर; बाधित रुग्णसंख्येने ओलांडला ९ लाखांचा टप्पा!

Subscribe

देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात २८ हजार ४९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५३ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाख ६ हजार ७५२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ७२७ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच सध्या ३ लाख ११ हजार ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५ लाख ७१ हजार ४६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

देशातील दुप्पटीचा दर हा ६३.०२ टक्के इतका आहे. तर कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याचा दर ९६.१ टक्के आणि मृत्यूदर ३.९९ टक्के इतका आहे.

१३ जुलै पर्यंत देशात १ कोटी २० लाख ९२ हजार ५०२ नमुना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी २ लाख ८६ हजार २४७ नमुना चाचण्या सोमवारी झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.

- Advertisement -

जगात सर्वाधिक कोरोना बाधित देश अमेरिका, ब्राझील आणि भारत आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३४ लाख ७९ हजार ४८३ कोरोनाबाधितांचा आकडा आहे. तर ब्राझीलमधला बाधितांचा आकडा १८ लाख ८७ हजार ९५९ इतका आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे बळी अमेरिका, ब्राझील आणि ब्रिटनमध्ये झाले आहे. अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा १ लाख ३८ हजार २४७, ब्राझील ७२ हजार ९२१ तर ब्रिटन ४४ हजार ८३०वर पोहोचला आहे.


हेही वाचा – क्यूआर कोड पास असेल, तरच लोकल प्रवासाला परवानगी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -