लॉकडाऊनमुळे दारु मिळेना, लत भागवण्यासाठी प्यायले सॅनिटायझर, सात जणांचा मृत्यू

लॉकडाऊनमुळे दारु मिळेना, लत भागवण्यासाठी प्यायले सॅनिटायझर, सात जणांचा मृत्यू

दारुची तलफ भागवण्यासाठी दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला आहे. सात जणांपैकी तिघांचा घरी तर इतरांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. लॉकडाउनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने रहावले न गेल्याने काही जणांनी दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.

राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे दुकानं बंद करण्यात आली आहेत. तर दारुच्या दुकांनानाही केवळ ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दारुची लत भागवण्यासाठी यवतमाळमधील काही जणांनी सॅनिटायझर प्यायले. यात सात जणांचा मृत्यू झाला. दत्ता लांजेवार,नूतन पाथरटकर,गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वणी शहरातील तेली फैल भागातील दत्ता लांजेवार आणि नूतन पथरकर हे दोघेजण दारुच्या शोधात होते. परंतु, दारुची दुकाने बंद असल्यामुळे त्यांची चांगलीच गैरसोय झाली. या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात दोघेही अपयशी ठरल्यामुळे त्यांनी अखेरीस सॅनिटायजर प्यायले. सॅनिटायझर प्यायल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागलं. शुक्रवारी रात्री या दोघांना कुटुंबीयांनी रुग्णालयात भरती केलं. रुग्णालयात काही काळ उपचार घेतल्यानंतर दत्ता आणि नुतन यांना सुट्टी देण्यात आली. परंतु, मध्यरात्री दोघांच्या छातीत पुन्हा दुखायला लागल्याने त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला.

 

First Published on: April 24, 2021 9:44 PM
Exit mobile version