Lok Sabha 2024: बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकत नाहीत; तर…; मोदींनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha 2024: बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकत नाहीत; तर…; मोदींनी स्पष्टच सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात होते

सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात होते. भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोदींची पार्क मैदानावर सभा झाली. या सभेच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात केली. ते म्हणाले, सर्व सोलापूरकरांना माझा नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी व ग्रामदैवत सिद्धेश्वरांना नमस्कार करत, तसंच, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. (Lok Sabha Election 2024 Babasaheb Ambedkar cant change the constitution how can I said by PM Narendra Modi)

नरेंद्र मोदी यांनी यावेळी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाहीत, मग मोदींचा प्रश्नच नाही, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मी यावर्षात दोन वेळा सोलापुरात आलो आहे. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा काहीतरी देण्यासाठी आलो होतो. आता मी तुमच्याकडून काहीतरी मागण्यासाठी आलो आहे. मला धन-संपत्ती नको. मला तुमचे आशीर्वाद द्या. मी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.

तुम्ही 2014 आधी भ्रष्टाचार, दहशतवाद बघितला. कलंकित इतिहास असूनही काँग्रेस पुन्हा देशाची सत्ता मिळवण्याचं स्वप्न पाहत आहे. इंडिया आघाडीचा विश्वास फोल ठरला आहे. तुम्ही मोदींचं प्रत्येक पाऊल पाहिलं आहे. तुम्ही मोदींना ओळखता. तर दुसरीकेड इंडिया आघाडीत नेत्यांच्या नावावर युद्ध सुरू आहे. एवढा मोठा देश त्यांच्या हातात चुकूनही तुम्ही देऊ शकत का? इंडिया आघाडीची लोकं सत्तेसाठी देशाची वाटणी करत आहेत.

ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने या वर्गाला ताकद दिली. तुम्ही काँग्रेसची 60 वर्षे पाहिली आहेत. मोदींचा 10 वर्षांचा सेवाकाळही बघितला आहे.

इंडिया आघाडीतले लोक 5 वर्षांत 5 पीएम अशी योजना आणत आहेत. प्रत्येक वर्षी नवीन पीएम. नकली शिवसेना म्हणत आहे की, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा आहे. त्यांच्या पक्षाच्या बडबोले नेत्याने म्हटलं आहे, आम्ही चार पंतप्रधान बनवू. त्यांना फक्त मलाई खायची आहे.

मोदींचा आणि तुमचा ‘दिल का नाता है’

काँग्रेसने आपल्या साठ वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांना सत्ता उपभोगण्याचा संधी मिळालेली असताना एसटी, एनटी, ओबीसी वर्गातील प्रत्येकाचा हक्क थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामागे त्यांची विचारसरणीदेखील तशी होती. या समाजाला असेच ठेवा आणि त्यांचे मतदान घेत रहा.

काँग्रेसने मुद्दाम या वर्गाला त्रास दिला असल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे. मात्र, मोदींचा आणि तुमचा दिल का नाता है, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: राम राम भारतात नाही तर काय…; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार)


Edited By- Prajakta Parab 

First Published on: April 29, 2024 3:38 PM
Exit mobile version