त्रिवेंद्रम एक्स्प्रेसमधून रेल्वे-प्लॅटफॉर्मच्या फटीतून चिमुरडा पडला ट्रॅकवर

त्रिवेंद्रम एक्स्प्रेसमधून रेल्वे-प्लॅटफॉर्मच्या फटीतून चिमुरडा पडला ट्रॅकवर

सौ. महाराष्ट्र टाईम्स

त्रिवेंद्रम एक्सप्रेसमधून उतरत असताना सात वर्षाचा चिमुरडा रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील फटीतून रेल्वे ट्रॅकवर पडला. ही घटना घडल्यानंतर रेल्वे स्थानकांवर उपस्थित प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला. मात्र या चिमुरड्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

अशी घडली घटना

ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता नागपूरच्या रेल्वे स्थानकावर घडली. सकाळी ७.३० वाजता नागपूरच्या प्लॅटफॉर्मवर दोन गोरखपूर त्रिवेंद्रम एक्स्प्रेसवर आली होती. या एक्सप्रेसच्या बी-२ या कोचमधून उतरत असताना सात वर्षाचा चिमुरडा रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या फटीतून चिमुरडा पडला ट्रॅकवर पडला. यावेळी सर्वच प्रवासी घाबरले. चिमुरडा खाली पडताच सर्वत्र आरडा-ओरड सुरू झाली.


हेही वाचा- मुंबई-पुणे हायवेवर अपघात; वाढदिवसादिवशीच डॉक्टरवर काळाचा घाला

एक्सप्रेस उभी होती म्हणून त्या स्थानकावर उपस्थित कुली अब्दुल मजिद व प्रेमसिंग मीना यांनी गाडीकडे धाव घेत चिमुरड्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, एक्सप्रेस सुरू झाली तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागली नसता. या मुलाला सुखरूप बाहेर काढताना दुसऱ्या बाजूने एक्सप्रेसच्या खाली जाऊन त्याचा जीव वाचवण्यात आला. यानंतर जीव वाचल्यानंतर चिमुरड्याच्या पालकांनी जीव वाचवणाऱ्या दोघांचे आभार मानले.

First Published on: September 16, 2019 10:48 AM
Exit mobile version