आज औरंगाबादमध्ये आढळले कोरोनाचे ७० नवे रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा ३१०६वर!

आज औरंगाबादमध्ये आढळले कोरोनाचे ७० नवे रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा ३१०६वर!

आज सकाळी औरंगाबादमध्ये ७० कोरोनाच्या नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा संख्या ३ हजार १०६वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार ७०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत उपचारादरम्यान १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी प्रशासनाने माहिती दिली आहे. आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये ३१ महिला आणि ३९ पुरुषांचा समावेश आहे.

आज या भागात आढळले कोरोनाबाधित रुग्ण

घाटी हॉस्पीटल परिसर (१), नॅशनल कॉलनी (१), सिंधी कॉलनी (१), पहाडसिंगपुरा (१), न्यू हनुमान नगर (१), पडेगाव (१), लक्ष्मी कॉलनी (२), हर्सुल, जटवाडा (१), म्हसोबा नगर, मयूर पार्क (१), खोकडपुरा (३), जय भवानी नगर, गल्ली नं. चार (२), एन आठ सिडको (२), एन नऊ,सिडको (२), महू नगर (१), गजानन नगर, गल्ली नं. नऊ गारखेडा (१), शिवाजी नगर, गारखेडा (१), एन बारा, हडको (१), कैसर कॉलनी (२), चिकलठाणा (१), नंदनवन कॉलनी (२),मिसारवाडी (१), नूतन कॉलनी (२), गांधी नगर (१), मुकुंदवाडी (१), सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर (१), नागेश्वरवाडी (१), श्रीराम नगर (१), रामेश्वर नगर (१), न्यू विशाल नगर (१), आझाद चौक (३), पुंडलिक नगर (१), स्वामी विवेकानंद नगर (१), हरीकृष्ण नगर, बीड बायपास (१), श्रीविहान कॉलनी (१), शक्ती अपार्टमेंट (१), गणेश कॉलनी (२), एमजीएम हॉस्पीटल परिसर (१), जाधववाडी, नवीन मोंढा (१), साई नगर, सिडको (१), टीव्ही सेंटर (१), सावित्री नगर, चिकलठाणा (१), बन्सीलाल नगर (१), औरंगपुरा (१), सुभाषचंद्र नगर, एन अकरा (१), जय भवानी नगर, गल्ली नं. एक (१), रामदेव नगर (१), बजाज नगर (२), सावरकर कॉलनी, बजाज नगर (१), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (१), इंदिरा नगर, पंढरपूर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (५), सिडको महानगर दोन (१) या भागात आज कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – Corona Update: चिंताजनक! पहिल्यांदाच देशातील नवीन रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ!


 

First Published on: June 18, 2020 11:25 AM
Exit mobile version