मराठवाड्यातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, विविध महत्त्वाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल

मराठवाड्यातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, विविध महत्त्वाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल

औरंगाबाद/ नांदेड – दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एटीएस आणि एनआयएकडून देशातील अनेक भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापे मारले. ज्यात मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा कारवाई करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यातून 9 जणांना अटक करण्यात आली. या 9 जणांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

औरंगाबाद मधून 5 जणांना अटक –

एटीएस आणि एनआयएकडून आज पहाटे राज्यातील अनेक भागात छापेमारी करण्यात आली. यात मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद एटीएसने औरंगाबाद येथून 4 आणि जालना जिल्ह्यातून 1 असे 5 जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तर पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यात औरंगाबादच्या नॅशनल कॉलनीतुन सय्यद फ़ैसल, बायजीपुरा भागातून पॉप्युलर फ्रंटचा माजी जिल्हाध्यक्ष शेख़ इरफ़ान, नासिर नदवी आणि परवेज़ खान याला बायजीपुरा येथून ताब्यात घेतले आहे. तर जालना येथील रहमान गंज भागातील अब्दुल हादी अब्दुल रौफ याला ताब्यात घेण्यात आले आहे.

नांदेड मधून 4 जण ताब्यात –

नांदेडमधून सुद्धा एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेडच्या देगलूर नाका भागात काल रात्री एटीएसच्या पथकाने छापा टाकत मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले होते. तसेच आणखी 3 सुद्धा पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर अखेर या 4 ही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

या कलमानुसार गुन्हा –

  1. 121A  देशाविरुध्द युध्द पुकारणे
  2. 153A जात,धर्म समुहात तेढ निर्माण करणे
  3. 109 एखांद्या गुन्हयाला मदत करणे
  4. 13(1)(बी) प्रतिबंधित कर्त्य करणे.
  5. 120B  कट रचणे
First Published on: September 22, 2022 6:46 PM
Exit mobile version